Ad will apear here
Next
दांडी येथील महिलांना घरगुती आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण


मालवण :
दांडी (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील मच्छिमार महिलांना विविध प्रकारच्या घरगुती आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण नुकतेच देण्यात आले. रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि महिला आर्थिक विकास महामंडळ (सिंधुदुर्ग) यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.



आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक प्रवीण सुलोकर यांनी या महिलांना प्रशिक्षण दिले. घरामध्ये गॅस सिलिंडर वापरताना काय काळजी घ्यावी, गॅसची गळती झाली तर काय करावे, कोणी विहिरीमध्ये पडले तर त्यास बाहेर कसे काढावे, हृदयविकाराचा झटका आल्यास कृत्रिम श्वासोच्छ्वास कसा द्यावा (सीपीआर) आदी बाबींचे प्रशिक्षण या महिलांना देण्यात आले. दांडी येथील महिलांचा या प्रशिक्षणाला चांगला प्रतिसाद मिळाला.



कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला आर्थिक विकास महामंडळाचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक नितीन काळे यांनी केले. ‘या प्रशिक्षणाचा उपयोग महिलांना दैनंदिन कामामध्ये होईल,’ असा विश्वास काळे यांनी व्यक्त केला. महिलांसाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक पी. के. गावडे यांनी दिली. मालवण येथील ‘सिंधुकन्या’च्या (माविम) व्यवस्थापिका गीता चौकेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि व्यवस्थापन केले.



मालवणच्या नीलक्रांती विविध कृषी, मत्स्यपर्यटन व पणन सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष रविकिरण तोरसकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांचे या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. रिलायन्स फाउंडेशचे सिंधुदुर्ग जिल्हा व्यवस्थापक राजेश कांबळे यांचेही सहकार्य होते. या कार्यक्रमाचे नियोजन व आभारप्रदर्शन रिलायन्स फाउंडेशनचे कार्यक्रम सहायक गणपत गावडे यांनी केले. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZSJCD
Similar Posts
रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी निःशुल्क हेल्पलाइन; ध्वनिसंदेशांद्वारे माहिती रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील १५ हजार शेतकऱ्यांना कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य, तसेच आपत्ती व्यव्यस्थापन विभागामार्फत विविध प्रकारच्या योजना, शेती-पशुपालनाची तांत्रिक माहिती, सामाजिक उपक्रम, रोजगार आदींसह अन्य आवश्यक माहिती ध्वनिसंदेशामार्फत देण्याचा उपक्रम नुकताच सुरू झाला. रिलायन्स फाउंडेशन माहिती
रत्नागिरी जिल्हा कृषी महोत्सवात ‘रिलायन्स’चा गौरव रत्नागिरी : राज्य शासनाचा कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने शहरातील देवळेकर मैदानावर एक ते पाच मार्च २०१९ या कालावधीत जिल्हा कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. ‘आत्मा’च्या सहयोगाने या महोत्सवाच्या माहिती प्रसारणाचे काम केल्याबद्दल रिलायन्स फाउंडेशनला महोत्सवात गौरविण्यात आले
मराठी सक्तीची मागणी करणाऱ्या आंदोलनाला ‘कोमसाप’च्या मालवण शाखेचा पाठिंबा मालवण : ‘महाराष्ट्रात सर्व क्षेत्रांत मराठी सक्तीची झालीच पाहिजे,’ या आंदोलनाला कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेने एकमुखी पाठिंबा व्यक्त केला आहे. २४ जून २०१९ रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे २४ मराठी संस्थांच्या वतीने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या यांच्या नेतृत्वाखाली आणि पद्मश्री मधू मंगेश कर्णिक
आता रत्नागिरीतही लुटा स्कूबा डायव्हिंगचा आनंद रत्नागिरी : निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेल्या कोकणातील रत्नागिरी हे एक निसर्गरम्य शहर. रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांना आता निसर्गसौंदर्यासोबतच समुद्रातील सौंदर्यही अगदी जवळून न्याहाळता येणार आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language